पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०७ ऑगस्ट
गडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास १ तास पाऊस बरसला होता. हवामान विभागाने ८ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांना पूर परिस्थितीचा जबर फटका बसला होता. काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने या भागातील पूर परिस्थिती ओसरली आहे. मागील काही दिवस गडचिरोलीत तापमान वाढला होता. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. दोन दिवस झालेल्या पावसामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.