जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे २८ जुलै रोजी आरक्षण सोडत
२९ ला आरक्षणाचे प्रारुप तर २९ ते २ ऑगस्ट पर्यंत हरकती व सुचना सादर करता येणार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ जुलै
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्याचे स्थगित करण्यात आलेल्या निवडुका घेण्याचे ठरवले असून त्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सुचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांची सभा २८ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. आरक्षणाचे प्रारूप २९ जुलै रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सुचना सादर करण्यासाठी २९ ते २ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
२८ जुलै रोजी जिल्हा परिषद, गडचिरोली सभेची वेळ दु. ३ वा. असून सभेचे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीचे परिसरातील जिल्हा नियोजन समितीचे नविन सभागृह आहे. पंचायत समिती, कोरची सभेची वेळ स. ११ वा.असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, कोरची आहे. पंचायत समिती, कुरखेडा सभेची वेळ दु. ३ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, तहसिल कार्यालय, कुरखेडा आहे. पंचायत समिती, देसाईगंज सभेची वेळ स.१२.३० वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, देसाईगंज आहे. पंचायत समिती, आरमोरी सभेची वेळ दु. ३.३० वा. असून सभेचे ठिकाण तहसिल कार्यालय, आरमोरी नविन प्रशासकीय ईमारत येथील सभागृह आहे. पंचायत समिती, धानोरा सभेची वेळ स. ११ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, तहसिल कार्यालय, धानोरा आहे. पंचायत समिती, गडचिरोली सभेची वेळ दु. ३ वा. असून सभेचे ठिकाण गोंडवाना कला केंद्र, पोटेगाव रोड, गडचिरोली आहे. पंचायत समिती, चामोर्शी सभेची वेळ दु. ३ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, चामोर्शी आहे. पंचायत समिती, मुलचेरा सभेची वेळ स. ११ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, मुलचेरा आहे. पंचायत समिती, एटापल्ली सभेची वेळ स. ११ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, एटापल्ली आहे. पंचायत समिती, भामरागड सभेची वेळ स. ११ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, भामरागड आहे. पंचायत समिती, अहेरी सभेची स. ११ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, अहेरी आहे. पंचायत समिती, सिरोंचा सभेची वेळ स.११ वा. असून सभेचे ठिकाण सभागृह, पंचायत समिती, सिरोंचा आहे.