उत्कृष्ट क्षेत्रीय अध्यक्ष पुरस्काराने प्रा. शेषराव येलेकर सन्मानित

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ जुलै
गोंदिया येथे नुकताच लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ चा ” राज सन्मान ” हा पुरस्कार वितरण सोहळा माजी प्रांतपाल राजेंद्र सिंग बग्गा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रा. शेषराव येलेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रांताचा उत्कृष्ट क्षेत्रीय अध्यक्ष या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. राजे मुधोजी भोसले, यशोधरा राजे भोसले व प्रांतपाल राजेंद्र बग्गा यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यमान प्रांतपाल लॉ. श्रवण कुमार, उपप्रांतपाल डॉ. रिपल राणे, माजी प्रांतपाल विनोद जैन, तसेच इतर माजी प्रांतपाल, प्रांतीय अधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रांतपाल राजेंद्र बग्गा यांनी २०२१ साली प्रा. शेषराव येलेकर यांच्यावर क्षेत्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या अंतर्गत लायन्स क्लब गडचिरोली, ब्रह्मपुरी, चंद्रपूर औद्योगिक नगरी, चंद्रपूर टायगर सिटी या चार क्लबची जबाबदारी देण्यात आली होती. लायन्स क्लब इंटरनॅशनलने दिलेल्या सुचेनेनुसार मागील सत्रात बाल्यावस्थेतील कर्करोग, भूक, दृष्टी, पर्यावरण, महिला सबलीकरण या पाच जागतिक समस्यांवर प्रा. शेषराव येलेकर यांच्या अंतर्गत येणाऱ्या क्लबने कार्य केले. गडचिरोली लायन्स क्लबने या पाचही समस्यांवर सर्वात जास्त कार्य करून, रिजनमध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले. क्लब बंद होऊ नये ते सतत सक्रिय राहावे तसेच प्रांत आणि क्षेत्र यांच्यामधील आंतरक्रिया अधिक सुदृढ करण्याचा प्रयत्न प्रा. येलेकर यांनी केला. या कार्यामुळे त्यांना उत्कृष्ट क्षेत्रीय अध्यक्ष या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
प्रा. शेषराव येलेकर हे ओबीसी नेते आहेत, ओबीसी समाजासाठी कार्य करीत असतानाच जिल्ह्यातील दुर्गम भागात लायन्स क्लबच्या माध्यमातून गरजूंसाठी आयोजित विविध उपक्रमात ते सहभागी होऊन कार्य करीत असतात. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.