आपला जिल्हा

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा गडचिरोलीत जल्लोष

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ जुलै

देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रॅली आणि फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला.

भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्यही केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात सभा घेण्यात आली. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्याने देशभरातील आदिवासींचा यथोचित सन्मान झाला आहे. त्यांचे जीवन दलित, आदिवासींसाठी प्रेरणादायी आहे, असे खा. अशोक नेते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, स्वप्नील वरघंटे, मोतीलाल कुकरेजा, संदीप कोरेत, सदानंद कुथे, लता पुंगाटी, विलास भांडेकर, संजय बारापात्रे, माजी जि.प. सदस्य रंजिता कोडापे, माजी नगरसेविका वर्षा शेडमाके, कुरखेड्याचे नगरसेवक एड. उमेश वालदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!