मराठा सेवा संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
कौशल्य आधारित शिक्षणावर भर द्या - प्रा.दिलीप चौधरी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ जुलै
मराठा सेवा संघ गडचिरोली व सर्व विभागाच्या वतीने १०वी व १२ वी विशेष गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रात नाविन्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा मराठा सेवा संघ गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष दादाजी चापले यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्ष म्हणून म.से.संघ गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष विनायक बांदूरकर, मुख्य मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेडचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.दिलीप चौधरी, मुख्य अतिथी म्हणून म.से.संघाचे माजी विभागीय अध्यक्ष शालीग्राम विधाते, जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्ष वर्षा नागपुरे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, गोविंदराव बाणबले उपस्थित होते.
१२वी मध्ये विशेष गुणांसह नाविन्य प्राप्त केल्याबद्दल श्याम झंजाळ, यश टिकले, अजिंक्य कुत्तरमारे, कृष्णा झाडे यांचा तर अमन बोरकुटे, राम झंजाळ, राघवन पटले, अनुश्री नीमसरकार, आर्या इंगोले, प्रणय चिमूरकर, श्रुती डोईजड, नंदिनी राऊत, मनीषा मेडिवार, शर्वरी काटे यांचा १० वी मध्ये विशेष गुणांसह नाविन्य प्राप्त केल्या बद्दल स्मृतिचिन्ह व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.ताडोबा पर्यटन आणि भौगोलिक परिस्थिती या विषयावर आचार्य पदवी मिळाल्या बद्दल डॉ.दिलीप चौधरी, उकृष्ठ शेतकरी म्हणून पांडुरंग घोटेकर, उत्कृष्ट पत्रकार म्हणुन प्रल्हाद मशाखेत्री तर वनविभागात उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल खुशाल मूनघाटे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
येणारा काळ हा स्पर्धेचा काळ असून विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकाचे असल्यास कौशल्य आधारित शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेषराव येलेकर, दादाराव चुधरी, भास्कर नागपुरे, पुलके, पी.पी.म्हस्के, टी. करोडकर, दिलीप मेश्राम आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कोहळे तर आभार चंद्रकांत शिवणकर यांनी मानले.