डॉ.नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्य पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ जुलै
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागात गरजूंना सोमवारी अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अन्यधान्य वितरण गाडीला शहर अध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, जितेंद्र मुनघाटे, अजय लोंढे, घनशाम वाढई, भूषण कुनघाडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.
अहेरी तालुक्यातील अहेरी आणि अलापल्लली येथे अन्य धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी अन्यधान्य चे वितरण करतांना अहेरी तालुका अध्यक्ष मुस्तक हकीम, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष रझाक पठाण, एटापल्ली नगरपंचायत चे नगरसेवक किसन हिचामी, नगरसेवक, निजान पेंदाम, एटापल्ली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहन नामेवार सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.