आपला जिल्हा

समाज एकसंघ राखण्यासाठी निस्वार्थ काम करणे आवश्यक: रतन शेंडे

जैन कलार समाजाचा स्नेह मिलन सोहळा; कोजागिरी निमित्ताने मान्यवरांचा सत्कार; समाज हिताच्या दृष्टीने विचारमंथन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १ नोव्हेंबर 

आजच्या काळात समाज एकसंघ राहणे खूपच महत्त्वाचे आहे. कलार समाजामध्ये गुणवंताची कमी नाही. मात्र समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन मागे पडलेल्या घटकाला पुढे नेणे गरजेचे आहे. यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या समाज बांधवांना पुढाकार घ्यावा लागेल. कलार समाजाची एकता टिकवण्यासाठी एकसंघ होण्याची गरज आहे. असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा जैन कलार न्यासाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे यांनी केले. 

जैन कलार समाज गडचिरोलीच्या पुढाकाराने शहरातील जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा व कोजागिरीचा कार्यक्रम मंगळवार,३१ऑक्टोबर रोजी चामोर्शी मार्गावरील कात्रटवार सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. समारोहाचे उद्घाटन कलार समाज मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारिणीचे संचालक भूषण समर्थ यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जैन कलार समाज बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप रणदिवे उपस्थित होते.

यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाज हिताच्या विषयावर समाजाच्या प्रगतीसाठी विचारांचे आदानप्रदान करण्यात आले.
सर्वप्रथम कुसुम रणदिवे व ज्योती मोरघरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवागत समाज बांधवांचा परिचय करून घेण्यात आला. याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ नागरिक लीला भिवापूरे, विजया समर्थ, मंजुळा रणदिवे, यशोदा हरडे, पुष्पा भिवापूरे, पुष्पा कवठे, कमल वैरागडे, नलिनी लांजेकर, जिजा समर्थ, कमल दडवे , सतीश आदमने, भानुदास डोर्लीकर, परशुराम समर्थ, भूषण समर्थ, कमल हजारे , लीला दहिकर आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी ज्योती मुरकुटे, शिल्पा आदमने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी यश भांडारकर, नंदिनी दडवे यांचाही सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
उद्घाटक भूषण समर्थ यांनी विविध कार्यक्रमांतूनच सामाजिक एकोपा वाढतो. यासाठी कोजागिरी, महिलांसाठी हळदीकुंकू अशा कार्यक्रमांसोबतच वधू वर परिचय मेळावा घेण्याचे आवाहन केले. यासाठी मध्यवर्ती मंडळ सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली मुरकुटे तर संचालन जिल्हा जैन कलार समाज न्यासचे सचिव पांडुरंग पेशने यांनी केले. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली लाड यांनी केले.आभार बचत गटाचे सचिव मनोज कवठे यांनी मानले.

कार्यक्रमात नितीन डवले ,प्रदीप लाड , हेमंत डोर्लीकर ,डॉ.उमेश समर्थ,सुधीर शेंडे, ॲड.अरुण रणदिवे , राजेंद्र लांजेकर, महेश मुरकुटे,राजू घुगरे. किशोर भांडारकर, कविश्वर बनपूरकर ,सुरेश वैरागडे, सुनील हजारे ,प्रमोद शेंडे , स्वाती कवठे , भाग्यश्री शेंडे,सुरेखा रणदिवे , अरुणा लांजेकर, स्नेहा शेंडे , सरिता पेशने,अर्चना मानापुरे ,अर्चना भांडारकर, कल्पना लाड , डॉ. पियुषा समर्थ , रीना दडवे, लता मुरकुटे , विराग रणदिवे, घनश्याम हट्टेवार, मंगेश खेडीकर, प्रदीप खेडीकर, दिलीप आष्टेकर, राजेंद्र खानोरकर ,गणेश हरडे, श्रीधर कवठे ,तुकाराम तिडके आदींसह जैन कलार समाजबांधवांनी बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!