आपला जिल्हाताज्या घडामोडी

वीज दुरूस्तीचे काम करताना जिवंत तारांच्या स्पर्शाने लाईनमनचा मृत्यू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१९ जून 

गडचिरोली तालुक्यातील दर्शनी माल या गावात सकाळी ९ वाजताच्या दरम्यान खांबावर चढून कार्बन स्वच्छ करण्याचे काम करीत असलेल्या लाईनमनचा जिवंत तारांच्या स्पर्शाने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.१९ जून रोजी घडली आहे. वैभव तुळशीराम जेंगठे वय २४ वर्ष असे मृतकाचे नाव असून तो येवली क्षेत्रात कार्यरत होता.

वैभव सोमवारी दर्शनी येथे एका विजेच्या खांबावर कार्बन काढायला चढला असता चुकीने विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाला.आणि विद्यूत प्रवाहाच्या जोरदार स्पर्शाने खांबावरच त्याचा मृत्यू झाला. एक वर्षापूर्वी तो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत लाईनमन म्हणून कामाला लागला होता. वैभव हा मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील मंगरमेंढा येथील रहिवासी होता.

वैभव हा येवली परिसरात तत्परतेने काम करणारा
लाईनमन म्हणून सुपरिचित होता. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्युने जेंगठे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन येवली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!