आपला जिल्हा

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली पूरपीडितांना मदत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २३ जुलै

गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात पाणी शिरले. अहेरी तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले. अशा पूरपीडितांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आर्थिक मदत केली.

नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.५ मधील प्रभुसादन परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन कंकडालवार यांनी भेट दिली तसेच नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. व पूरपिडीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अहेरी न.पं.चे अध्यक्ष रोजा करपेत, न.पं. चे बालकल्याण सभापती मीना ओंडरे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विलास सिडाम, विलास गलबले, महेश बाकेवार, ज्योती सडमेक, सुरेखा गोडसेलवार, निखत रियाज शेख, हरी श्रीनिवास छाटारे, सलाम शेख, रमेश वड्डे, नानाजी लालसू नरोटे, सुखराम मडावी, कोरके मडावी, सुरेश मडावी, मदाना आत्राम, सोमी मडावी, महेश मडावी, महेश मडावी व इतर नागरीक उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!