आपला जिल्हा

आदिवासी मूल्य समजून घेण्यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता – वाहरू सोनवणे

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ११ ऑगस्ट

आदिवासी समुदायाच्या संस्कृतीचे जतन आणि त्यांच्या मानवी अधिकारांचे रक्षण करण्यासाठी सर्वप्रथम आदिवासींची मूल्ये समजून घेणे आवश्यक असून, त्यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी वाहरू सोनवणे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी संशोधन व विकास केंद्राच्या वतीने ‘आदिवासी संस्कृती, इतिहास व बोलीभाषा’ या विषयावर आयोजित एकदिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, तर प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, आदिवासी संशोधन व विकास केंद्राचे समन्वयक वैभव मसराम उपस्थित होते.

आदिवासींचा जल, जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती हक्क आणि अधिकारांची ओळख, सामजिक ऐक्य, अस्तित्व, आत्मसन्मान, अस्मिता कायम राहावी यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे श्री. सोनवणे म्हणाले.

देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आदिवासी स्त्रियांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका वठवली, वाहरु सोनवणे यांनी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!