पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून १३२ जणांना वाहन चालक प्रशिक्षण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०२ ऑगस्ट
जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील युवक युवतींना रोजगार मिळावा या उद्देशाने गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस विभाग व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै ते १ ऑगस्ट पर्यंत १३२ जणांना दुचाकी व चारचाकी वाहने चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यात १०० युवक, २० युवती व १२ आत्मसमर्पितांचा समावेश आहे.
सदर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ पोलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे सोमवारी पार पडला. निरोप समारंभ कार्यक्रमात स्व. सपोनी योगेश गुजर यांच्या कुटुंबियांकडून प्रशिक्षणार्थींना कायदे व नियम चे पुस्तक वाटप केले.सन २०२१-२०२२ मध्ये पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ४०० युवक, २० युवती व १२ आत्मसमर्पित असे एकुण ५०२ बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच निरोप कार्यक्रमच्या दिवसी प्रशिक्षणार्थींना दुचाकी व चारचाकी वाहने चालविण्याचे लायन्स व प्रमाणपत्र देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आजपर्यंत गडचिरोली पोलिस विभागाने रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण व दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ४८५ सूरक्षा रक्षक, ११४३ नर्सिंग असिस्टंट, ३०५ हॉस्पिटॅलिटी, २५४ ऑटोमोबाईल, १४२ इलेक्ट्रिशियन, २७ प्लंबिंग, ३३ वेल्डिंग, १०३ जनरल ड्युटी असिस्टंट, ११ फिल्ड ऑफिसर तसेच ५२ व्हिएलई असे एकुण २२५४ बेरोजगार युवक-युवतींना रोजगार देण्यात आले. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा)सोनापुर व बिओआय आरसेटी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांत युवक व युवतींना ३०१२ स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय्या मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडें व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गौतम चिकनकर, कमल केशव ड्रायव्हिंग स्कूल चे संस्थापक निलेश बांबोळे उपस्थित होते.