चारचाकी वाहनाची पुलाला जोरदार धडक
गडचिरोली येथील बट्टूवार कुटुंबातील एकाचा मृत्यू तर दोन जखमी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ ऑगस्ट
नागपूर वरून गडचिरोली येत असलेल्या भरधाव चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भिवापूर जवळील नाल्याच्या पुलाला जोरदार धडक बसली. यात गडचिरोली येथील सुनील बट्टूवार व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले तर मुलगा कृष्णा याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, सुनील बट्टूवार यांची मुलगी अमेरिकेत शिकत आहे. सोमवारी अडीच वाजता तिची विमान असल्यामुळे सुनील आपल्या पत्नी व मुलासह तिला सोडण्यासाठी नागपुरात आले होते. मुलीला सोडून गडचिरोली परत येत असतांना वाहनाचे नियंत्रण सुटल्याने भिवापूर जवळील नाल्याच्या पुलाला जोरदार धडक बसली. व पलटी झाली. यात सुनील यांच्या मुलगा कृष्णा याचा जागीच मृत्य झाला. तर सुनील व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. दोघांना नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.