आपला जिल्हा
जिल्ह्यात २५ ‘अमृत सरोवर ‘ तयार ; १५ ऑगस्ट रोजी किनाऱ्यावर ध्वजारोहण होणार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १३ ऑगस्ट
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे स्मरण करण्यासाठी २०२२ -२३ या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ जलाशये, तलाव निर्मिती किंवा त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांनाच ‘अमृत सरोवर’ असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. गडचिरोली जिल्ह्यात १०४ अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ अमृत सरोवर पूर्ण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी या अमृत सरोवरांच्या किनाऱ्यावर ध्वजारोहण केले जाणार आहे. उर्वरित १५ ऑगस्ट २०२३ या दुस-या टप्प्यात पूर्ण होतील.
गडचिरोली जिल्ह्यातील अमृत सरोवर
जिल्ह्यातील चांभार्डा, मुडझा बुज, अरततोंडी, देउळगाव , चिखली , गेवर्धा , कोटगुल, खमनचरु, मरपल्ली, इरुकडुम्मे, गेदा, जांभळी, खुर्सा, इंजेवारी, मन्नेराजाराम, आमगाव महाल, लखामापुर (बोरी), बेलगाव, चिखली, मल्लेरा, जोगीसाखरा, बहादुरपूर, भोगणबोडी, दुधमाळा, निमनवाडा येथे अमृत सरोवर तयार झालेली आहेत. या अमृत सरोवरांच्या किनाऱ्यावर १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाणार आहे.