लाचखोर कृषी सहायकासह एका इसमास अटक
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि ०५ ऑगस्ट
कृषी केंद्र विक्री परवाने अपडेट करून एक नवीन परवाना व कृषी केंद्र परवाने स्थलांतरीत करण्याच्या कामाकरिता १० हजाराची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक व एका व्यक्तीस रंगेहाथ अटक केली. जया महेश व्यवहारे असे लाचखोर कृषी सहायकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील पोवनी येथील तक्रारदार असून त्यांचे ४ कृषी केंद्र विक्री परवाने सरकारी पोर्टल वर अपडेट करून १ नवीन परवाना व कृषी केंद्र परवाने स्थलांतर करायचे होते. ते कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक जया महेश व्यवहारे याच्याकडे गेले असता त्यांनी १० हजारांची लाच मागितली. व ते झेरॉक्स सेंटरमधील वैभव धोटे यांचेकडे देण्यास सांगितले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने चंद्रपूर एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने सापळा रचून लाच स्वीकारतांना कृषी सहायक व खाजगी इसमाला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, नरेश ननावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, मेघा मोहूलें. पुष्पा काचोळे यांनी केली.