आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

योग ही भारताची जगाला देणगी – बी. प्रभाकरण

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने सुरजागड लोह खाण व कोनसरी प्रकल्पात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ जून 

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व आणि या वर्षीच्या ‘एक पृथ्वी, एक आरोग्य योगासह’ या संकल्पनेवर प्रकाश टाकताना सांगितले की “योग ही भारताची जगाला देणगी आहे. एलएमईएलला आज या जागतिक स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या उत्सवात सहभाग नोंदवण्याचा अभिमान आहे. कर्मचारी आणि स्थानिक समुदायांना निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या योगासह इतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता एलएमईएल अधोरेखित करते”.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (एलएमईएल) वतीने शनिवारी सुरजागड लोहखनिज खाण आणि कोनसरी येथील प्रकल्पात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ५०० च्या वर लोकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

सुरजागड लोहखाणीमध्ये अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि जवळपासच्या गावातील रहिवाशांनी सामूहिक योगसत्रात सहभाग घेतला. कोनसरी प्रकल्पात अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ग्रामस्थांसह मुला-मुलींनी देखील उत्साहाने भाग घेतला.

कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या सगळ्यांना एलएमईएलतर्फे अल्पोपहार आणि भेटवस्तू देण्यात आल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!