स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेसने घेतला तीनही विधानसभांचा आढावा
कांग्रेसची संघटनात्मक मोर्चेबांधणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ जून
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता, संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धती आणि पक्ष बळकटीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने १९, २० व २१ जून या तीन दिवसांत अहेरी, गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठका पार पडल्या.
नगर पंचायती, नगर परिषदा व जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस ची रणनीती कशी राहील, कार्यकर्ता आणि नेता, आजी, माजी लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस प्रभावी भूमिकेत राहील. या दृष्टिकोनातून आढावा बैठकांमध्ये विविध विषयांवर सखोल मंथन झाले. प्रभावी उमेदवार आणि विश्वासार्ह कार्यकर्ते यांचे भरवशावर निवडणुकीत यश संपादन करणे, गटातटाच्या राजकारणाला मुठमाती देउन जिल्ह्यात कांग्रेसची सत्ता आणने, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि सामान्य जनतेच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे नव्या दमाचे कार्यकर्ते, नेते घडवणे यावर सखोल चर्चा करण्यात आली.
तीनही विधानसभा क्षेत्रातील बैठकांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, काँग्रेस निरीक्षक सचिन नाईक तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत पुढील निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यांनी संघटनेच्या मजबुतीसाठी प्रत्येक पातळीवरील कार्यकर्त्यांनी संघटीत आणि जिद्दीने काम करण्याच्या सूचना केल्या.
अहेरी विधानसभेच्या बैठकीत माजी आमदार पेंटारामजी तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, अहेरी तालुका अध्यक्ष पप्पू हकीम, एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार, सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, भामरागड तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी आणि अध्यक्ष अनुसूचित जाती किशोरजी शंभरकर, हनिफ शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.सुनिता कुसनाके, माजी सभापती भास्कर तलांडे, संचालक मलिकार्जुन आकुला, माजी उपसभापती गिता चालुरकर, माजी उपाध्यक्ष नगरपंचायत विष्णू मडावी, उपाध्यक्ष अल्पसंख्यक रिजवान शेख, शौभान कोडावार, अज्जु पठाण, गणेश उपलावार, उषा आत्राम, शाहजिदा पठाण यांची उपस्थिती होती.
गडचिरोली विधानसभेच्या बैठकीत उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंकज गुड्डेवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड.विश्वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेल अध्यक्ष अब्दुल भाई पंजवानी, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदू वाईलकर, हरबाजी मोरे, घनश्याम वाढई,विनोद लेनगुरे, नेताजी गावतुरे, रमेश चौधरी, जितेंद्र मूनघाटे, रवींद्र सुरपाम, दिवाकर निसार, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के, योगेंद्र झंझाड, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर, अनिल कोठारे, रमेश मूनरत्तीवार, सुधीर मडावी, सुधीर बांबोळे, कुसुम आलाम, कल्पना नांदेश्वर, मंगला करंगामी, जनाबाई परसें, शालिनी पेंदाम, कविता उराडे, रिता गोवर्धन, पूनम किरंगे, सुनीता रायपूरे, शेवंता हलामी, श्रीनिवास ताटपल्लीवार, प्रफुल अंबोरकर, रमेश मानकर, अनिल धकाते, पुरुषोत्तम बावणे, यादव गामस्कर, कमलेश खोब्रागडे, रवी मेश्राम, विपुल येलट्टीवार, महेंद्र उईके, मारोतीजी कोन्हे,नंदकिशोर शेडमाके, देवेंद्र बांबोळे, चारुदत्त पोहाणे, विजय राऊत, नंदू वाईलकर, पितांबर वासेकर, गौरव येणप्रेड्डीवार, कुलदीप इंदूरकर यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आरमोरी विधानसभेच्या बैठकीत ऐमाजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पाटील नाट, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कोरची मनोज अग्रवाल,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा प्रशांत कोराम, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस वामनराव सावसाकडे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील सरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमालाताई पेदाम, माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी सभापती गिरधर तितराम, माजी उपसभापती नितीन राऊत, माजी नगराध्यक्ष आशाताई तुलावी, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस पंकज चहादे, माजी पंचायत समिती सदस्या सौ. सध्याताई नैताम, सौ. आरती लहरी, सौ. भारती कोसरे, निलोफर शेख, हिराभाई मोटवानी, हकीमुदीन शेख यांचा समावेश होता.
याशिवाय प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, स्थानिक समस्या आणि संघटनेच्या कामकाजाबाबत मते मांडली. स्थानिक प्रश्नांवर संयुक्त कृती करून त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती दिशा ठरवण्यात आली.