अनियंत्रित झालेल्या ट्रकच्या धडकेत मनसेचे जिल्हाध्यक्ष जखमी
शहरातील मच्छीमार मार्केट जवळची घटना; काही काळ चक्का जाम सदृश्य परिस्थिती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ जून
शहरातील राष्ट्रीय महामार्गाने चंद्रपूर कडून येत असलेल्या एका ट्रक चालकाने, त्याचा ट्रक अचानक अनियंत्रित झाल्याने एका इसमाला धडक दिली. त्यात ते जखमी झाले. मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे असे जखमीचे नाव असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष आहेत. या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी कारगील चौकातील मच्छी मार्केट जवळ चंद्रपूर मार्गे येणाऱ्या वाहनांना अडवून चक्काजाम केले.
चंद्रपूर मार्गाने सिमेंट चा ट्रक क्रमांक एम. एच. ३४ बि. ९२८९ गडचिरोली शहरात येत होता. या ट्रक चा ड्रायव्हर हा दारू पिऊन ट्रक चालवत असल्याचे सांगितले जात आहे. या ट्रक ने मनसेजिल्हा अध्यक्ष राजेंद्र साळवे यांना धडक दिली. या मुळे त्यांचे हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांचे हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी नेहमीच होणाऱ्या अपघाताकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी चक्का जाम केले. या मार्गावरील वाहतूक जवळपास पाऊण तास बंद झाली होती. घटना स्थळी पोलीस उशिरा पोहचले.
या मुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी बळजबरीने चंद्रशेखर भडांगे, जख्मी असलेले मनसे अध्यक्ष राजेंद्र साळवे त्यांचे जेष्ठ बंधू सेवानिवृत्त शिक्षक यांना बळजबरीने उचलले. या वेळी सेवानिवृत्त शिक्षक विजय साळवे यांनी पोलिसांनी ढकल्याने त्यांच्या पायाला लागले.
ट्रक ड्रायवर हा नशेत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रक जप्त केले आहे. वृत्त लिही पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.