मोदी सरकारच्या त्रिसूत्री धोरणाने देशात नवचैतन्य निर्माण केले
भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे वक्तव्य

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ११ जून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा संकल्प करीत त्यास सिद्धिस नेण्याचे काम करीत आहेत.परिणामी भारत जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. असे वक्तव्य भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केले. ते मोदी सरकारच्या ११ वर्षपूर्ती संदर्भात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी प्रमुख भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चा च्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, आदिवासी आघाडी चे जिल्हा नेते डॉ.नितिन कोडवते, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अनु.जाती आघाडी चे जिल्हाध्यक्ष अँड. उमेश वालदे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तु सुत्रपवार, गोवर्धन चव्हाण, विलास पा.भांडेकर, आनंद खजांजी, सलिम शेख, अँड. विजय चाटे, विनोद देवोजवार , रमेश नैताम, किर्ती कुमार मासूरकर, श्याम वाढई, प्रशांत अल्लमपटलावार, तसेच जिल्ह्यातील सर्वच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा, सुशासन व गरीब कल्याण या त्रिसूत्रीचा अवलंब करून भारताला एका नव्या उंचीवर नेले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्रातून देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा थेट लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहे. त्यांनी कलम ३७० हटविणे, तीन तलाक बंदी, राम मंदिर निर्माण, सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर, कोरोनाच्या संकटावर मात हे निर्णय मोदी सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक असल्याचे नमूद केले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत ८० कोटींना मोफत अन्नधान्य, उज्ज्वला योजनेत १० कोटी महिलांना गॅस कनेक्शन, पीएम किसान सन्मान निधीत ११ कोटी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत. स्वच्छ भारत अभियानात १० कोटी शौचालये. गरीब कल्याणासाठी ४ कोटी घरांचे स्वप्न साकार, जल जीवन मिशन: १३ कोटी घरांत शुद्ध पाणी, आयुष्मान भारत: ६० कोटी लाभार्थी; ५ लाखांपर्यंत मोफत विमा, मुद्रा योजनेत २५ लाख कोटी कर्ज वाटप ही सरकारच्या निर्णयाची वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. हा काळ विकसीत भारताच्या दिशेने वाटचाल करणारी दिशादर्शक प्रक्रिया आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘वंदे भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ अशा उपक्रमांनी देशाची नवी ओळख घडवली आहे असेही त्यांनी सांगितले.