आपला जिल्हाताज्या घडामोडी

नक्षलवाद्यांच्या शाळेतील शिक्षिका व विभागीय समिती सदस्यसहा ४ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ३ फेब्रुवारी 

अबुजमाड भागात नक्षलवाद्यांकडून चालविल्या जाणाऱ्या जनताना शाळेत सहा वर्षे शिक्षिकेचे काम करणारी वनीता झोरे व अगदी प्रारंभीच्या काळात १९९१ साली नक्षलवादी चळवळीत सामील झालेला म्होरक्या आणि बालन्ना या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला विभागीय समिती सदस्य अशोक सडमेक या दाम्पत्या सह साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर आणि त्याची पत्नी मुन्नी पोदीया कोरसा यांनी सोमवारी पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले. रविवारी भामरागड तालुक्यातील कियर येथे नक्षलवाद्यांनी एका निरपराध इसमाची हत्या केली. या पार्श्वभूमीवर हे आत्मसमर्पण महत्वाचे मानले जात आहे.

जिल्ह्यातील अर्कापल्ली निवासी
अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर, डी.व्हि.सी.एम टेक्नीकल टीम, वनिता दोहे झोरे, एसीएम टेक्नीकल टीम, वय 54 वर्षे, रा. कोरनार, साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर, प्लाटून-32 सदस्य, वय 30 वर्षे रा. तुमरकोडी, मुन्नी पोदीया कोरसा, पार्टी सदस्य, वय 25 वर्षे, रा. सिलीगेंर ता. कोळा, जि. सुकमा (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.

अशोक उर्फ बालन्ना हा १९९१ मध्ये अहेरी दलम मध्ये भरती झाला आणि जवळपास ३५ वर्ष तो विविध दलम मध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत राहिला. अधिक वय झाल्यामुळे सशस्त्र लढ्यात पोलीसांसमोर आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात घेऊन या दाम्पत्याने आत्मसमर्पण केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्याचेवर एकुण ८२ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये चकमक, जाळपोळ, व इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. वनिता दोहे झोरे ही बालन्नाची पत्नी असुन ती १९९३ मध्ये एटापल्ली दलममध्ये भरती होवून ३२ वर्ष नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या पदांवर कार्यरत राहिली. यात सहा वर्ष तिने शिक्षिकेचे काम केले. एटापल्ली दलम सदस्य ते टेक्नीकल टीमची एसीएम असा तिचा प्रवास आहे. तिच्यावर आजपर्यंत ११ गुन्हे दाखल आहेत.

साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर हा२०११ मध्ये जनमिलिशिया म्हणून भरती होवून भामरागड दलम ते प्लाटून ३२ च्या सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर आजपर्यंत एकुण ४ गुन्हे दाखल आहेत. मुन्नी पोदीया कोरसा ही साधुची पत्नी असुन ती २०१५ मध्ये बासागुडा दलममध्ये भरती होवून कार्यरत झाली. आत्मसमर्पणापर्यंत ती माड डिव्हिजन मध्ये जनताना सरकार स्कुलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिच्यावर सध्या तरी गुन्ह्याची नोंद आढळली नाही.

अशोक वर १६ लाख रूपये पत्नी वनिता दोहे झोरे हिच्यावर ६ लाख रूपयाचे, साधू लिंगु मोहंदा वर ४ लाख तर मुन्नी पोदीया कोरसा हिच्यावर २ लाख रूपये असे एकूण २८ लाखांचे बक्षीस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अशोक व वनीता या दाम्पत्याला १६ लाख आणि साधू व मुन्नी या दाम्पत्याला ११ लाख रूपये मिळणार आहेत. आजपर्यंत एकुण ६९५ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

वरिष्ठ नक्षल कॅडर हे वाढत्या वयामुळे होणारे शारीरिक त्रास आणि विविध आजारांनी घेरले असल्याने सशस्त्र चळवळीत भाग घेऊ शकत नाहीत. या प्रमुख कारणास्तव आत्मसमर्पण करीत असल्याचे गेल्या वर्षभरात झालेल्या आत्मसमर्पणातून दिसून येते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!