आपला जिल्हाताज्या घडामोडी

दोन्ही जनसुनावणीत लॉयड्सच्या विस्तारीत लोहप्रकल्पाला नागरिकांचा पाठिंबा

विकास प्रकल्पांना कोणाचाही विरोध नाही : राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२८ जानेवारी 

लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटैडच्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खनन १० दशलक्ष टनावरुन ६० दशलक्ष टनांपर्यत वाढविण्यासाठी आणि हेडरी, बांडे व पुरसलगोंदी येथे नवे लोहप्रकल्प उभारण्यासाठी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने गडचिरोली येथील नियोजन भवनाच्या सभागृहात दोन वेगवेगळ्या पर्यावरणविषयक जनसुनावण्या घेण्यात आल्या. यावेळी औद्योगिक विकासाद्वारे बेरोजगारी दूर करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी लॉयड्सच्या लोहप्रकल्प विस्ताराला एकमुखाने पाठिंबा दिला.

जिल्हाधिकारी अविशांत पांडा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले यांच्या उपस्थितीत ही जनसुनवाणी घेण्यात आली. याप्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, खासदार डॉ.नामदेव किरसान, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी लॉयड्सच्या वाढीव प्रकल्पाचे स्वागत केले.

सुरुवातीला लॉयड्सच्या अधिकाऱ्यांनी खाण परिसरात कंपनी राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची आणि शिक्षण, आरोग्य व मुलभूत सुविधांविषयक कामांची माहिती दिली. लॉयड्सने हेडरी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सीबीएसई शाळा सुरु केली आहे. लोहप्रकल्पात आधी दिलेल्या रोजगारा- व्यतिरिक्त आणखी ६ हजार लोकांना रोजगार देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, उपसरपंच प्रशांत आत्राम, नागुलवाडीचे सरपंच गावडे यांच्यासह सुरजागड, हेडरी, पुसरलगोंदी, बांडै आणि परिसरातील गावांतील नागरिकांनी कंपनीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत प्रदूषण होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राजकीय नेत्यांनी त्यांचे मत व्यक्त करताना सांगितले की सुरुवातीला ते या प्रकल्पाच्या विरोधात होते. परंतु लॉयडस मेटल्सने मागिल पाच वर्षांपासून स्थानिक नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधुन विश्वास निर्माण केला. जिल्ह्यात लोहप्रकल्प निर्माण केला. आणि आता त्याचा विस्तार केला जातो आहे. कायदे, नियम व आदिवासींचे परंपरागत स्थान, त्यांची श्रद्धा स्थान यांना धक्का न लावता तथा स्थानिकांच्या समस्या मार्गी लाऊन लोहखनिज कारखान्याचा विस्तार केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ही जनसुनावणी झाली म्हणजे प्रकल्पाला परवानगी मिळाली असे नाही. हे स्पष्ट करीत प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जनसुनावणी चा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल तिथे पुन्हा एकदा सुनावणी झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!