गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून आपला विरोध : आमदार डॉ. होळी
गडचिरोली येथे गोंड समाज संघटनेच्या वतीने राणी दुर्गावती जयंती समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ६ ऑक्टोबर
मागील १० वर्षापासून आपल्या आमदारकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण केलेल्या विकास कामामुळे जनतेमध्ये आपली लोकप्रियता वाढत चालली असून एक नवीन राजकीय नेतृत्व उदयास होताना दिसून येत असल्याने आपले विरोधक नवीन राजकीय नेतृत्व निर्माणच होऊ नये म्हणून आपला विरोध करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे गोंड समाज संघटनेच्या वतीने आयोजित राणी दुर्गावती जयंती समाज प्रबोधन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
यावेळी मंचावर माजी आमदार हरिराम वरखडे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, माजी आमदार हिरामण वरखडे, पावीमुरांडा जमीनदार तथा जिल्हा जंगल कामगार सोसायटीचे अध्यक्ष पूर्णचंद्र रायसिडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके , डॉक्टर प्रमोद खंडाते प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉक्टर होळी म्हणाले की, आपण सातत्याने विकासाचे स्वप्न घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये आपण लोकप्रिय होत असून भविष्यातील सक्षम राजकीय नेतृत्व असल्याचे जनतेला दिसून आले आहे. मात्र आपले विरोधक हे होऊ नये, गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होवू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत.