आपला जिल्हा

२०२४ मध्ये आमदार डॉ देवराव होळी हे अनुलोम चे राज्यातील पहिले आमदार असतील

गडचिरोलीतील अनुलोम च्या मेळाव्यात विभाग प्रमुख गजाननजी शिंदे यांचे प्रतिपादन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २८ सप्टेंबर 

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी हे अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम ) च्या वस्ती व स्थान मित्रांचा मेळावा घेणारे पहिले आमदार असून ते सातत्याने गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करीत आहेत. त्यांनी केलेले काम व महायुती सरकारचे काम हे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अनुलोमच्या स्थान व वस्ती मित्रांनी घ्यावी व येणाऱ्या काळामध्ये आमदार डॉक्टर देवराव होळी यांना निवडून आणावे असे आवाहन करीत आमदार डॉक्टर देवराव होळी हे अनुलोमचे राज्यातील पहिले आमदार असतील असे प्रतिपादन अनुलोमचे विभाग प्रमुख मा. गजाननजी शिंदे यांनी गडचिरोली येथील अनुलोमच्या स्थान व वस्ती मित्र मेळाव्याला मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी, अनुलोमचे सह विभाग प्रमुख प्रवीण पोहाणे, गडचिरोलीचे उपविभाग प्रमुख अशोकजी शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना गजानन म्हणाले की, आज राज्याला छत्रपती शिवरायांच्या विचारांची खरी गरज आहे छत्रपती शिवरायांनी मोघलांना पराजित करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले.  परंतु आता पुन्हा मोघली विचारांच्या नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी शिवरायांच्या विचारांना पायदळी तुडवले आहे. एकीकडे मोघलांची सेना तर एकीकडे शिवरायांचे हिंदुत्वाची बाजू धरून चालणारी भाजपा शिवसेना आहे. समाजाला आज कोणाच्या बाजूने उभे राहावे हे ठरवण्याची वेळ आली आहे . ज्या लोकांनी सतत शिवरायांच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न सतत करत आहेत. त्यांना येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉक्टर देवराव होळी अत्यंत उत्तम काम करीत असून अनुलोमच्या सर्व कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!