आपला जिल्हा

१६ अवैध वाळू तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. ३ कोटी ३० लक्ष ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

रेती तस्करांवर पोलीसांची पहीलीच कारवाई.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१६ मार्च 

आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी रेतीघाटावर रात्री च्या दरम्यान खोब्रागडी नदीपात्रातुन वाळू तस्कर अवैधरित्या मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबीचे साहाय्याने वाळुचा उपसा करीत असताना गडचिरोली पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून १६ वाळू तस्करांसह ३ कोटी ३० लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अलीकडच्या काळातील पोलीस विभागाची रेती तस्करांवरील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय आणि
खात्रीशीर माहितीच्या आधारे डोंगरतमाशी रेतीघाटावर १४ मार्च ला रात्री १०  च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वाखाली नियोजनबध्द सापळा रचुन छापा टाकला असता नदीपात्रातुन वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबीचे साहाय्याने वाळुची अवैधरीत्या उपसा करीत असल्याचे आढळून आले. सदर चोरी केलेल्या रेतीची रात्रीच विल्हेवाट लावुन परजिल्ह्यात विकत असल्याचे स्पष्ट झाले. रेतीघाटावर पंचासमक्ष पंचनामा केला असता सदर ठिकाणी खोब्रागडी नदीपात्रातुन उपसा करण्याकरीता वापरण्यात येणारे पोकलेन मशीन व रेती वाहतुकीकरीता वापरात येणारे १२ मोठे ट्रक व टिप्पर
तसेच सदर अवैध रेती चाहतुकीकरीता आरोपींचे गस्त घालण्याकरीता असलेली कार असा एकुण ३ कोटी ३०लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यात निखील शंकरराव भुरे (३५) चाठोडा, ता. जिल्हा नागपूर, राहुल बाजीराव घोरमोडे (३० ) बेटाळा, पो. किन्ही, ता. ब्रह्मपूरी, जिल्हा चंद्रपूर, सोनल नानाजी उईके डोंगररतमाशी, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली, धनंजय यशवंत मडावी डोंगरतमाशी ता.आरमोरी जिल्हा गडचिरोली, यशवंत महादेव मडकाम कुरंडीमाल ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली, नितेश उमेश मालोदे (३०) निलज ता. पवनी, जिल्हा भंडारा, अफसर अनवर शेख (२६) ता. भिवापूर, जिल्हा नागपूर अब्दुल राजीक मो. इसमाईल (५४) अमरावती अत्ताउल्ला खॉन रियाज उल्ला खॉन, (३०) लालखडी अमरावती, नरेश तुकाराम ढोक (३४) भिवापूर जिल्हा नागपूर, नासीर नाजीम शेख, (१९) बिडगाव ताजनगर ता. कामठी जिल्हा नागपूर, संतोष ज्ञानेश्वर पवार (२८) तळेगाव ठाकुर ता. तिवसा जिल्हा अमरावती, शेख वसीम शेख जलील (२८) मंगरुळ दस्तगिर ता. धामनगाव जिल्हा अमरावती, निखील गोपाल सहारे (२३)विरली ता. लाखंदुर जिल्हा भंडारा, जावेद जमीर खान (२८) ओलंग जिल्हा लात्तेहार (झारखंड), शाम मनसाराम चौधरी वय (३५)कोर्धा ता. नागभिड जिल्हा चंद्रपूर अशा १६ इसमांना ताब्यात घेवून आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आणि कलम ३७९, ३४, २०१ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद केला.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली कडुन करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असुन जिल्ह्यात चोरून लपुन रेती घाटावरून नदीपात्रातुन रेतीचा अवैधरीत्या उपसा करणाऱ्या तस्करांना धडकी भरली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सदरच्या कारवाईत पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पो. उप निरीक्षक दिपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरुषोत्तम बाडगुरे, हवालदार नरेश सहारे, हेमंत गेडाम, पोलिस नाईक सतिश कत्तीवार, दिपक लेनगुरे, शुक्रचारी गवई, राकेश सोनटक्के, अंमलदार जगदाळे, सुनिल पुढावार, मंगेश राऊत, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सचिन घुबडे, अकबर पोयाम, संजु कांबळे, सुगश यट्टी, माणिक दुधबळे, पुर्णचंद्र बांबोळे, शगीर शेख, मनोहर येलम, पंकज भगत, फोटोग्रॉफर देवेंद्र पिद्दुरकर यांचा सहभाग होता.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!