आपला जिल्हाक्राईम स्टोरी

१६ लक्ष इनामी डिव्हीसीएम सह तीन नक्षल्यांचा खात्मा

गडचिरोली पोलीसांची कारवाई

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१३ मे 

गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात पेरमिली एलओएस कमांडर तथा विभागिय समिती सदस्य बस्तर निवासी वासु याचे सह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील कतरनगट्टा येथील जंगल परिसरात पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार पेरमिली दलमचे नक्षलीकतरनगट्टा येथील जंगल परिसरात आपला कॅम्प लाऊन पोलीसांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने बसले होते. ही माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० या नक्षलविरोधी पथकाचे जवान शोध अभियानावर निघाले. अभियानादरम्यान पोलीसांच्या पथकाची चाहूल लागताच कॅम्प मधील नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह एक पुरुष असे एकूण तीन नक्षलवादी मृत्यूमुखी पडले असल्याचे आढळून आले. घनदाट जंगलाचा फायदा घेऊन इतर नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर पोलिसांनी केलेल्या शोध अभियानादरम्यान तीन मृतदेहांसह एक एके ४७, एक कार्बाईन आणि एक इनसास रायफल यांसह नक्षल साहित्य सापडले आहे. मृतक तीन नक्षल्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो पेरमिली दलम कमांडर तसेच विभागिय समिती सदस्य बस्तर निवासी वासु असल्याचे म्हटले आहे. त्याचेवर १६ लक्ष रुपयांचे बक्षीस आहे. दरम्यान परिसरात शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

 

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!