आयपीएल वर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या १० जुगाऱ्यांवर अहेरी पोलिसांची कारवार्ई
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २९ एप्रिल
गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीसांनी अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी ॲप नाइस ७७७७ फन या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा खेळवित असल्याचे दिसुन आले. घटनास्थळावरुन नामे निखील दुर्गेे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख ९४२० रुपये असा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत १० जुगाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.
पोलिसांनी केलेल्या सापळा कारवाई नंतर दोन्ही आरोपींच्या अधिक चौकशीत असे निष्पन्न झाले की इरफान ईकबाल शेख रा. अहेरी याचे अप्पर लाईनला संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असुन सदर बेकायदेशिर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा जुगार चालविणारे निखील दुर्गेे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात तसेच त्यांचे (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आय. पी. एल. सट्टयामध्ये एजंट चे काम करतात. त्यामुळे गुन्हयातील आरोपी निखील मल्लया दुर्गेे, आसिफ फकीर मोहम्मद शेख, धंनजय राजरत्नम गोगीवार, निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण, इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, संदिप गुंडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम ४ व ५ कायदयान्वये गुन्हा नोंंद करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी दशरथ वाघमोडे, पोउपनि जनार्धन काळे, पोउपनि गवळी, पोहवा काबंळे, संजय बोलीवार,पठाण, मडावी, शेन्डे, अंमलदार केंद्रे, देवेंंद्र दुर्गेे, सुरज करपे, दहिफळे व भंडे यांनी पार पाडली.