आपला जिल्हा

रोजगार हमीची थकीत मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा 

शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २८ एप्रिल 

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध कामे हातात घेण्यात आली असून मागील चार महिन्यांपासून या कामावरील मजूरांना मजूरी मिळाली नव्हती. शेकापने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून रोजगार हमी योजनेच्या मजूरांची मजूरी तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी केली होती. या पाठपुराव्यामुळे जिल्हाभरातील रोजगार हमीच्या कामावरील मजूरांची थकीत असलेली ३० कोटींहून अधिकची मजूरी रक्कम मजूरांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचा दावा शेकापचे जिल्हा चिटणीस यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १२ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, सध्या लग्नसराई चे दिवस सुरू झालेले आहेत. मात्र रोजगार हमीच्या कामावर राबून चार महिने झाल्यानंतरही मजूरीचा रुपयाही मजूरांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोजगार हमीच्या मजूरांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. त्यामुळे आपण प्राधान्याने याकडे लक्ष द्यावे. व दर आठवड्याला मजूरी देणे बंधनकारक असतांनाही चार महिण्यांचा विलंब झाल्याच्या कारणास्तव अतिरिक्त रक्कमेसह तातडीने जिल्ह्यातील सर्व मजूरांची थकीत मजूरी वाटप करावी. याबाबत प्रशासनाने दखल घेत १४ एप्रिल पर्यंतची संपूर्ण मजूरी मजूरांच्या खात्यावर जमा करणे सुरू केले आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!