आपला जिल्हा

मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पंधरा दिवसात मार्गी लागणार – खासदार अशोक नेते यांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन

अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय मागे

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १६ फेब्रु.

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रखडलेले काम येत्या १५ दिवसात मार्गी लागून सुरू केले जाईल आणि लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या चामोर्शी मार्कंडा परिसरातील भाविक भक्त व नागरिकांना दिली. त्यामुळे अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय मागे घेण्यात आला.

मंदिराचे रखडलेले काम पुन्हा सुरू व्हावे यासाठी चामोर्शी येथील सुनील शास्त्री महाराज, मुरलीधर महाराज यांच्यासह अनेक भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून अन्नत्याग आंदोलनाची तयारी केली होती. मात्र यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्हाधिकारी संजय मीना यांनी या भाविकांची भेट घेऊन त्यांना या कामासाठी पुरातत्व विभागाकडे वारंवार कसा पाठपुरावा सुरू आहे आणि या कामाची सध्याची स्थिती काय आहे हे समजावून सांगितले.
मार्कंडा देवस्थानाच्या विकासा संबंधित माझा सतत नेहमी वारंवार सातत्याने प्रयत्न आहे.तो मार्गी लावणारच अशी ग्वाही खासदार नेते यांनी यावेळी दिली. पुरातत्व विभागातील प्रशासकीय अडथळ्यांमुळे मार्कंडेश्वर मंदिराचे काम थांबले होते. परंतु या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठक घेऊन हे काम मार्गी लावण्यात आले आहे. त्यांच्या आवाहनानुसार, अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय मागे घेण्यात आला.
यावेळी सुनिल शास्त्री महाराज, मुरलीधर महाराज, मनिष महाराज, पुंडलिक नेवारे महाराज, इस्कॉनचे परमेश्वर प्रभू, पिपरेजी महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, भाजपा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, राकेश बेलसरे, भास्कर बुरे, तसेच मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!