आपला जिल्हा

पोटेगाव रस्ता दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिकांचे आंदोलन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २७ जानेवारी 

पोटेगाव ते गडचिरोली रस्ता रुंद करून दुरुस्ती करण्यात यावा या मागणीसाठी पोटेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद मडावी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच सावेला गावाजवळ रास्ता रोको आंदोलन केले.  उल्लेखनीय आहे की मागील तीन ते चार वर्षांपासून हा रस्ता संपूर्ण पणे तुटला असून दुरुस्तीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळ आली. 

या संदर्भात आमदार डॉ देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी,  सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊनही  त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पोटेगाव परिसरातील नागरिक संतापले आहेत.  या तुटलेल्या रस्त्यामुळे कित्येक जणांचे अपघात झालेले आहेत , कित्येक शाळेच्या बसेस, ट्रॅक्टर , दवाखान्याच्या गाड्या बंद पडले आहेत , रस्त्याची दुर्दशा झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा याच रस्त्यांनी पुढे जाऊन शासनाचे उपक्रम राबविण्यात येतात.  परंतु रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे  दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर युवा सामाजिक कार्यकर्ते विनोद मडावी यांनी या परिसरातील सरपंच आणि जागरूक तरुण आणि नागरिक यांना एकत्रित करून न्याय मागणीसाठी आंदोलन केले आहे. जर काय रस्त्याचे काम जानेवारी महिन्याअखेर सुरु न झाल्यास पोटेगाव येथे होत असलेल्या २९ तारखेच्या पीएम जणमन युवा संवाद कार्यक्रम हाणून पाडू. अशा इशारा आंदोलनादरम्यान देण्यात आला.

आंदोलनात पोटेगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विनोद मडावी,सावेला  येथील पोलीस पाटील पूर्णशहा मडावी, सरपंच वासुदेव मडावी, राजोलीच्या सरपंच कांता हलामी,  मारोडाचे सरपंच जगदीश मडावी पोटेगावच्या  सरपंच अर्चना सुरपाम,संतोष वडे तोहगाव , आशिष मडावी युवा कार्यकर्ते पोटेगाव , शेखर परसे , धनराज दामले राजोली, किशोर नरोटे पोटेगाव , सीमाताई दिवाकर कोराम , मुरलीधर गोटा , विनोद कनाके , सचिन कोवासे , सुरेखा मडावी , संदीप पोटावी पाटील गव्हाळेती वडे जी कोसमघाट , मधुकर गोटा सुईमारा , अजय तुंकलवार , धीरज बेहरे, प्रदीप बांबोळे , आणि पोटेगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित होती.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!