आपला जिल्हाराजकीय

उद्या गडचिरोलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची विभागीय बैठक

महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सह माजी मुख्यमंत्री व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत घेणार आढावा,

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१९ जानेवारी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची विभागीय बैठक उद्या शनिवारी गडचिरोली येथे पार पडणार असून, या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सह इतर आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, याप्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या बाईक सह रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबई येथे काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात राज्यभरातून पदाधिकारी सहभागी झाले होते.
यादरम्यान लोकसभानिहाय इच्छुकांचे अर्ज मागण्यात आले. त्यावर चर्चादेखील झाली. त्यामुळे विभागस्तरावर आढावा घेऊन लोकसभा उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, रामटेक आणि नागपूर या लोकसभा क्षेत्रांचा बदललेल्या राजकीय समीकरणाच्या परिप्रेक्ष्यात आढावा घेतला जाईल. २०१९ च्या निवडणुकीत चंद्रपूर ही महाराष्ट्रातील एकमात्र लोकसभा कांग्रेसकडे होती. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे तीही रिक्त झाली. २०१४ मध्येही कांग्रेसकडे केवळ दोन लोकसभा होत्या. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रणनीती कांग्रेस कशी आखते याकडे लक्ष लागले आहे. गडचिरोली लोकसभेकरीता कांग्रेसच्या नऊ इच्छूकांनी पक्षाकडे आवेदन अर्ज दाखल केले आहेत. यात मागील दोनदा पराभूत डॉ. नामदेव उसेंडी आणि मागील पाच वर्षांपासून सक्रिय डॉ. नामदेव किरसान या दोन नावांची प्रामुख्याने चर्चा केली जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!