मानवाधिकारांचे संरक्षणासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा कार्यविस्तार : दहिवले
विपूल खोब्रागडे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२७ नोव्हेंबर
भारतात दररोज लक्षावधी भारतीय नागरिकांच्या मानवी अधिकारांचे हनन होताना दिसून येत आहे. मात्र सामान्य माणूस त्याविरोधात लढण्यासाठी कमकुवत पडतो. दैनंदिन पोटाची खळगी भरण्यातच त्याचे आयुष्य व्यतीत होते. या सामान्य माणसाचे मानवी अधिकार त्याला मिळावे यासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटना देशभर कार्य करीत आहे.मानवाधिकार ही लोकहिताची चळवळ व्हावी असे मतही त्यांनी व्यक्त केले. संघटनेचा कार्यविस्तार होऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांनी केले. ते गडचिरोली येथे मानवाधिकार मार्गदर्शन शिबीरात बोलत होते. या शिबीरात विपूल खोब्रागडे यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले की गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल वने व विविधतेने नटलेला जिल्हा आहे. येथे आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पिण्याचे पाणी, रोजगाराच्या समस्या आहेत. बऱ्याच वेळेस आपल्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत असते. त्यांना कुठलीही मदत कोणत्याही स्वरूपात त्यांना मिळत नाही त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित असतात. यासाठी जिल्ह्यात लवकरच मानवाधिकार संघटनेचे कार्यालय स्थापन करुन जिल्ह्यातील नागरिकांचे मानवी अधिकार त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
भामरागड,सिरोंचा,एटापल्ली, अहेरी, कोरची सारख्या तालुक्यात पावसाळ्यात पूर्णपणे संपर्क तुटलेला असतो. शेती घर जनावरे यांच्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते. हे सर्व कुठेतरी थांबायला पाहिजे. शासनाच्या विकासात्मक कामाच्या माध्यमातून मानवी अधिकाराचे संरक्षण केले जाऊ शकते. यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती करणे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. तसेच मानवाच्या भारतीय संविधान दिलेल्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे या करिता संघटनेच्या वतीने गाव, तालुका व जिल्हा स्तरावरती प्रयत्न केले जातील. असे नवनियुक्त अध्यक्ष विपूल खोब्रागडे यांनी सांगितले