ओबीसींसाठी माझी लढाई कायम राहणार
भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे याचे प्रतिपादन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि. २२ जुलै
मी सुरुवातीपासून ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी लढत आलो आहे. माझी ओळखही ओबीसी नेता म्हणूनच आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष आज झालो. त्यामुळे ओबीसींसाठी माझी लढाई कायम राहणार आहे. असे प्रतिपादन भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची शनिवारी पत्रकार परिषदेत केले.
पक्षाने माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला पक्षाच्या चौकटीत राहून न्याय देणे, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश खेचून आणे. यासाठी शेवटच्या माणसापर्यंत पक्ष पोहोचवणे ही माझी प्राथमिकता असेल असे ते पुढे म्हणाले.
अध्यक्ष झाल्यानंतर शनिवारी श्री वाघरे यांचे दिल्लीहून गडचिरोली येथे प्रथमागमन झाले. या प्रसंगी भाजपच्या वतीने त्यांचे गांधी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. खासदार अशोक नेते, आमदार डॉ होळी, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, रविंद्र ओल्लालवार यांचेसह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तर पत्रकार परिषदेला प्रकाश गेडाम, रविंद्र ओल्लालवार, चांगदेव फाये, मुक्तेश्वर काटवे,दिलीप चलाख यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.