अंतरंग मैत्रीतून तो झाला हत्याकांडात सहभागी ; महागाव विषप्रयोगातून हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २७ आक्टोंबर
“त्याची तिच्याशी शालेय जीवनापासून अंतरंग मैत्री होती. ती तारुण्यासह विवाहानंतरही कायम राहिली. तिने माहेरी आल्यावर त्याला वैवाहिक जीवनातील कटू अनुभव वाट्याला आल्याचे सांगून त्याची मदत मागितली. आणि त्यानेही आपल्या पहिल्यावहिल्या प्रेमाची कदर करीत तिच्यासाठी अपराधात शामिल झाला”. महागांव विषबाधेतून पाच जणांच्या हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीस पोलीसांनी केले जेरबंद केले आहे. अविनाश ताजणे असे आरोपीचे नाव असून तो संघमित्राचा अंतरंग मित्र असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथे मागील एक महिण्याच्या कालावधीत शंकर कुंभारे यांचे परिवारातील त्यांच्यासह त्यांची पत्नी विजया कुंभारे, मुलगा रोशन कुंभारे, मुलगी कोमल दहागांवकर व साळी वर्षा ऊर्फ आनंदा उराडे या ५ व्यक्तींचा अचानक मृत्यू झाल्याने संपुर्ण परिसरात खळबळ माजली होती.
पोलिसांच्या तपासात असे लक्षात आले की, संघमित्रा रोशन कुंभारे हिच्या पुर्वाश्रमीचा मित्र अविनाश ताजणे, रा. खामगांव, जि. बुलढाणा याने विष खरेदी करण्याकरीता संबंधीत कंपनीस पैसे पाठविले होते. अविनाश व संघमित्रा यांची शालेय जीवनापासून मैत्री असून संंघमित्राचा विवाह झाल्यानंतर काही दिवस दुरावा निर्माण झाला. परंतु संघमित्रा ही उपचारार्थ तिचे माहेरी अकोला येथे गेली असतांना ती परत अविनाश ताजणे याचे संपर्कात येवून तिने तिच्या सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगीतले. नजीकच्या काळात त्यांच्यातील संपर्क वाढल्याने संघमित्राने तिच्या सासरच्या व्यक्तींना मारण्याची योजना ताजणे यास सांगून त्याची मदत मागीतली. तेव्हा अविनाशने संघमित्रा हिच्या सांगण्यावरून दोन वेळा विष खरेदी केले त्यासाठी अविनाशने पैसे पुरविले असल्याचे तपासात निष्पन्न होताच अकोल्यातून अविनाश ताजणे यांस ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यास दिनांक २६ आक्टोंबर रोजी अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने पोलीस कोठडीत असलेले आरोपी संघमित्रा रोशन कुंभारे व रोेजा प्रमोद रामटेके यांना ४ दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. त्याचप्रमाणे नव्याने अटक करण्यात आलेला आरोपी नामे अविनाश ताजणे याला ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.