आपला जिल्हा

गडचिरोली पोलीस दलातील ४१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक

दोन जवानांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १४ ऑगस्ट

पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी करणा­ऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी गडचिरोली पोलीस दलातील ४१ अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक व २ पोलीस अंमलदारांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकाने सन्मानित करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांमध्ये पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक संदिप भांड, पोनि संदिप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, सपोनि मोतिराम मडावी, सपोनि योगिराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजरत्न खैरनार, पोउपनि दयानंद महाडेश्वर, पोउपनि हर्षल जाधव, पोहवा. सेवकराम मडावी, नापोशि राजू कांदो, दामोधर चिंतुरी, राजकुमार भलावी, सागर मुल्लेवार, शंकर मडावी, रमेश आसम, जिवन उसेंडी, राजेंद्र मडावी, मनोज गज्जमवार, सुभाष गोंगले, दसरू कुरसामी , पोशि अविनाश कुमरे, पोशि गोंगलु तिम्मा, महेश सयाम, साईकृपा मिरकुटे, रत्नय्या गोरगुंडा, विलास पदा, मनोज इस्कापे, अशोक मज्जी, देवेंद्र पाकमोडे, रोहित गोंगले, दिपक विडपी, सुरज गंजिवार, गजानन आत्राम, पोशि योगेश्वर सडमेक, अंकुश खंडाळे या जवानांना राष्ट्रपतीचे पोलीस शौर्य पदक मिळाले असून, सहा. फौजदार प्रवीण बेझलवार व सहा.फौ प्रमोद ढोरे यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.

गडचिरोली पोलीस दलातील तीन जवानांना मरणोत्तर पुरस्कार

गडचिरोली पोलीस दलातील तीन जवानांना उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांच्या मरणोत्तर पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. यात शहीद पोउपनि धनाजी होनमाने, पोहवा. स्व. जगदेव मडावी व शहीद पोशि किशोर आत्राम यांचा समावेश आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!