आपला जिल्हा

झेंडेपारच्या जनसुनावणीत भांडवलदारांच्या पायघड्या घालण्यासाठी गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रशासनाची अघोषित आणिबाणी सदृष्य परिस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालय बॅरिकेड्स ने पॅक करणे सुरू; कंपनीद्वारे पैशांची आणि कामाची आमिषं देऊन खाणीच्या बाजूची माणसं आणली जात आहेत; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ आक्टोंबर

मंगळवारी होऊ घातलेल्या झेंडेपारच्या जनसुनावणीत भांडवलदारांच्या पायघड्या घालण्यासाठी गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात प्रशासनाची अघोषित आणिबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराताला सील केले जात असून पोलीसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. सुरजागडच्या विस्तारीत प्रकल्पासाठी झालेल्या सुलतानी सुनावणी प्रमाणेच यावेळी सुद्धा व्यवस्था करण्यात येत असल्याचे दिसून येते. 

कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे लोहदगडाच्या खाणीतून उत्खनन सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणीय जनसुनावणी आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी ही जनसुनावणी अवैध असुन ती रद्द करीत पुढे स्थानिक ठिकाणीच घेण्यात यावी असा परिसरातील ग्रामसभांचा आग्रह आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन आक्षेप नोंदवले आहेत.

जनसुनावणीच्या या पद्धतीवरच जिल्ह्यातील नागरिकांचा आक्षेप आहे. जनसुनावणी ही प्रकल्पाचे ठिकाणी मुक्त आणि खुल्या वातावरणात झाली पाहिजे, ग्रामसभांचे सामुहिक मत विचारात घेतले पाहिजे, पाचव्या अनुसूचिनुसार आदिवासी आणि स्थानिक निवासींचे परंपरागत हक्क, सांस्कृतिक ठेवा, श्रद्धास्थानं, वनांवरचे आणि इतर अधिकार अबाधित ठेवून नंतरच सरकारने या क्षेत्रात आपले पाय ठेवावे. असे असताना शासन आणि प्रशासनाने पाचव्या अनुसूचितील स्थानिकांच्या अधिकारांवर घाला घालून मनमर्जी चालवत भांडवदारांसाठी पायघड्या घालताना दिसून येत आहे. या विरोधात स्थानिक आणि आदिवासी आक्रोशीत असून तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!