विशेष वृतान्त

नगरसेवक आषिश पिपरे व त्यांचे सहकारी हे पोलीस तपासात आरोप मुक्त

खोट्या कंपन्या स्थापन करून गरीब महिलांची फसवणूक केल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून येत नसल्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १७ नोव्हेंबर 

चामोर्शी येथील नगरसेवक तथा भाजपचे नेते आशिष अरुण पिपरे, आणि सहकारी नरेंद्र कुनघाडकर व रमेश अधिकारी यांनी खोट्या कंपन्या स्थापन करून गरीब महिलांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्याचेवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी तक्रार कविता किरमे यांनी केली होती. त्या आधारे चामोर्शी पोलीसांनी केलेल्या चौकशीनंतर नगरसेवक आशिष अरुण पिपरे, आणि सहकारी नरेंद्र कुनघाडकर व रमेश अधिकारी यांनी कोणत्याही खोट्या कंपन्या स्थापन करून गरीब महिलांची फसवणूक केल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून येत नसल्याने त्यांच्या विरोधातील तक्रार अर्ज तात्पुरता दप्तरी दाखल करण्याची विनंती तपास अधिकारी, चामोर्शी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार वासुदेव अलोणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.सदर प्रकरणात राजकिय दबावामुळे एकमेकांचे तक्रारी करत असल्याचेही नमूद केले आहे.

नगरसेवक आशिष अरुण पिपरे खोट्या कंपन्या स्थापन करून गरीब महिलांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्याचेवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा
असा तक्रार अर्ज दाखल केला होता.
गैरअर्जदाराच्या तक्रारी संबंधाने प्रश्न उपस्थित केल्यावर गैरअर्जदारास माहिती मागवली असता त्यांनी ८८ पानी लेखी उत्तर सादर केले.
सदर लेखी उत्तराचे तपासणी केली असता त्यात गैरअर्जदारांच्या नावावर असलेल्या भारत सरकारच्या सूक्ष्म एवं मध्यम मंत्रालय चे उद्यम रजिस्ट्रेशन आणि शिवम इंडस्ट्रीजने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोंदणी अर्थात गुमास्ता लायसन्स आणि जीएसटी सर्टिफिकेट हे खरे असल्याचे दिसत आहे. अगरबती प्रकरणात स्वतः गैर अर्जदार हे देखील अर्जदाराप्रमाणे पार्टी असून त्याविरोधात चामोर्शी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केलेला असल्याचे नमूद केले आहे.

आशिष पीपरे हे बॅक व्यवस्थापक बैंक अधिकारी यांचे सह ५ ते ६ लोंकाना घेवुन एका पीकप गाडीमध्ये दोन खुल्या अगरबत्ती निर्मीती मशिन घेवुन तीच्या घरी घेवून गेले परंतु मशिन बरोबर नसल्याने परत करण्यात आल्या. सदर अगरबत्ती उद्योग बंद असुन ४० ते ४५ महीला हे
उपासमारीवर आहेत व त्यांना कोनताही उद्योग नाही आहे त्या मुळे त्यांची माझी व शासनाची फसवनुक केली आहे. असा आरोप करण्यात आला होता.

या आरोपाचे अनुषंगाने तपास अधिकारी चामोर्शी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार वासुदेव अलोणे यांनी गैरअर्जदार यांचे बयाण नोंदवून त्यांचे कडुन सदर अगरबत्ती प्रकल्पाचे कागदपत्रे हस्तगत केली असता कलेल्या करारनाम्यानुसार कुणाचीही फसवणुक झाल्याचे दिसुन येत नसुन, सदर प्रकरणात राजकिय दबावामुळे एकमेकांचे तक्रारी करत असुन अगरबत्ती प्रकल्प नियमीत सुरु असल्याचे म्हटले आहे. तक्रारदार वगळता इतर सर्व महीलांना रोजगार मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. या मध्ये आशिष पिपरे, नरेंद्र कुनघाडकर, रमेश अधिकारी, यांनी सदर अगरबत्ती प्रकल्पात तक्रारदार, व शासनाची कोणतीहि फसवणुक झाल्याचे निष्पन्न होत असल्याचे दिसुन येत नाही.

जर सदर प्रकरणत अर्जदार महिला, तसेच ईतर महिला व शासनाची फसवणुक झाली असल्यास शासनाकडुन सदर अगरबत्ती प्रकल्पामध्ये असलेल्या इसमांच्या नावाने पोलीस स्टेशनला तक्रार आल्यास फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याची तजविज ठेवली आहे. सदर अर्ज निकाली  काढल्याबाबात अर्जदार महिलेस कळविण्यात आले असल्याचे म्हटले आहे. आणि सदरचा अर्ज हा तात्पुरता दप्तरी दाखल करण्यासाठी तपास अधिकारी चामोर्शी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार वासुदेव अलोणे यांनी विनंती केली आहे.

या अहवालानंतर आषिश पिपरे यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ अपलोड करून, भाजप मध्ये व चामोर्शी तालुक्यातील सहकार क्षेत्रात आपले राजकीय वजन वाढत असल्याने हेतूपुरस्सर आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपमधील काही आणि सहकार क्षेत्रातील एका नेत्याने रचल्याचे म्हटले आहे. या विरोधात आपण सर्वांगीण लढाई लढणार असून संबंधितांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!