आपला जिल्हा

महाविकास आघाडीचा कार्यकाळ वगळता कुठेही कमी पडलो नाही.

आमदार डॉ. होळींनी मांडला ९ वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ३ आक्टोंबर 

गडचिरोली विधानसभेतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मी त्या विश्वासाला सार्थ ठरवत मागील ९ वर्षांपासून या विधानसभेत विविध विकास कामांसाठी हजारो कोटींचा निधी केंद्र आणि राज्य सरकार कडून आणन्यात यश मिळवले आहे. असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केले. ते विधानसभा सदस्य म्हणून आपल्या दोन टर्म मधील ९ वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी प्रदेश सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महासचिव योगिता पिपरे, सचिव विलास दशमुखे यांचे सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आम्हाला अपेक्षित विकास निधी मिळाला नाही. एवढा अपवाद वगळता साडेसहा वर्षात गडचिरोली विधानसभेसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास निधी प्राप्त झाला. आणि त्यातून, न भूतो अशी विकास कामे पूर्णत्वास आली आणि सध्याही सुरू आहेत.

सिंचन क्षेत्रात चिचडोह बॅरेज, कोटगल उपसा सिंचन योजना पूर्ण झाली असून कोटगल बॅरेजच, आणि तळोधी उपसा सिंचन चे काम अंतिम टप्प्यात आहे. अन्य उपसा सिंचनाच्या योजना मंजूरीच्या मार्गावर आहेत. गडचिरोली विधानसभेतील ४९ हजार ६१ शेतकऱ्यांच्या ३५ हजार २६१ हेक्टर जमीनी वर्ग १ केल्या आहेत,१ रुपयात विमा संरक्षण,५१०५ शेततळे,२०१ बोड्या,१३५० विहीरी आणि जलयुक्त शिवार योजनेतून १९७ गावात ४४५२ शेतकऱ्यांची ६७ कोटींची कामं पूर्ण झाली अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पायाभूत सुविधांमध्ये विविध रस्ते,पूल, दुरसंचार टॉवर्स, मोफत गॅस, घरकुल देण्यात यश प्राप्त झाले आहे. ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रातही मोठी कामे झालेली आहेत. क्रीडा, पाणीपुरवठा, बसस्थानके, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून एक हजार कोटींच्या आसपास विकास कामे पूर्ण झाली असून आणखी कामे सुरू आहेत असे डॉ होळींनी पत्रकारांना सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी, कृषी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ४२ कोटींचा निधी, महिला व बाल रुग्णालयात आवश्यक पदभर्ती आणि निधी, १०० खाटांच्या नवीन रुग्णालय बांधकाम सुरू,नवीन वसतीगृहे बांधकाम, नियोजन भवन आणि आरटीओ भवनाची निर्मिती ही आपल्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. प्रस्तावना विलास दशमुखे यांनी केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!