आपला जिल्हा

भ्रट सरपंचाला वाचवण्यासाठी ठेकेदारांनी प्रतिष्ठा लावली पणाला

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १ आक्टोंबर 

गडचिरोली  तालुक्यातील गुरवळा येथील सरपंच दर्शना भोपये यांनी मनमानी आणि भ्रष्ट कारभार करीत असल्याचा ठपका ठेवून सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव दाखल होवू नये यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या ठेकेदारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आज दिवसभर प्रयत्न चालविले आहेत.

गुरवळा येथील सरपंचांनी पदभार स्वीकारल्यापासूनच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप या अविश्वास प्रस्तावात केला असून त्यांनी मोठी कमीशन खोरी करुन विकासकामांत भ्रष्टाचार केला असल्याचेही म्हटले आहे. गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न न करता अरेरावीची वागणूक देत असल्याने अविश्वास प्रस्ताव दाखल केला असल्याने या सरपंचाला वाचवण्यासाठी काॅग्रेस आणि भाजपच्या तालुका अध्यक्षांसह ठेकेदारांनी खासदार आणि आमदारांचे दबाव आणून सदस्यांवर अविश्वास प्रस्ताव पारित होऊ नये यासाठी प्रयत्न चालविले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

त्यामुळे अपहरण आणि दबाव आणला जात असल्याची तक्रार लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!