आपला जिल्हा

दोन अभियानात सहा लाख इनामी तीन माओवाद्यांस अटक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१० सप्टेंबर 

गडचिरोली नक्षलविरोधी अभियान पथकाच्या जवानांकडून मागील दोन दिवसांत राबविलेल्या दोन वेगवेगळ्या अभियानात ३ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.

गोपनिय खबरीच्या आधारे भामरागड पोलीस उपविभागातीलत ताडगाव पोलीस मदत केंद्रातील विशेष अभियान पथकाचे जवान जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना सरजु ऊर्फ छोटु बंडु महाका, वय 28 वर्षे, मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी, वय 23 वर्षे यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.आले व त्यांना न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांचाही विसामुंडी जवळपुलावर काम करणा­ऱ्या ठेकेदाराचा मिक्सर व जेसीबी जाळला होता. माओवादी सरजु हा २०१० मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत होता. त्याचा ४ चकमक व व्यक्तींच्या खुनात सहभाग होता. तसेच माओवादी मधु हा सन २०२५ मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन सन २०१७ पर्यंत कार्यरत होता. त्याचा ३ व २ व्यक्तींच्या खुनात सहभाग होता.

दुसऱ्या एका अभियानात भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात अशोक लाला तलांडी, वय 30 वर्षे, रा. पासेवाडा, तह. कुडरु, जि. बिजापुर (छ.ग.) हा माओवादी लपून बसलेला असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या नारगुंडा पोलीस पार्टी, सिआरपीएफची डी-३७ बटालियन व विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवून त्याला अटक केली. तो सन २०१७ मध्ये छत्तीसगड येथील सँड्रा दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाला व त्यानंतर मागील २ वर्षापासुन स्वत:चे घरी राहुन माओवादी चळवळीमध्ये अधुन-मधुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कार्यरत होता. तसेच दिनांक ३० एप्रिल रोजी मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. या चकमकीमध्ये ३ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. महाराष्ट्र शासनाने या तिन्ही माओवाद्यांवर प्रत्येकी २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७० माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड गणापूरे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!