आपला जिल्हा

सुरजागड लोहखाणीच्या १३११  हेक्टर विस्तारासाठी १.२४  लाख झाडे कापण्याची परवानगी 

बदल्यात पर्यावरण संरक्षणासाठी लॉयड्स मेटल्स ३० नवीन रोपे लाऊन जगवणार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ११ जून 
देशातील उच्च दर्जाचे लोहखनिज असलेल्या गडचिरोलीतील सुरजागड पहाडावरील   लोहखनिज काढण्यासाठी लॅायड्स मेटल्सला वाढीव ९३७ हेक्टरची लिज देण्यास पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. १३११ हेक्टर भूक्षेत्रातील १ लाख २४ हजार झाडांची  टप्याटप्याने तोड करण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्या बदल्यात लॅायड्स मेटल्सने पर्यावरण संरक्षणासाठी ग्रीन गडचिरोलीचा संकल्प करत ३० लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

लॅायड्स मेटल्सला सुरजागड लोहखाणीसाठी आधी ३७४ हेक्टरचे क्षेत्र लिजवर मिळाले आहे. त्यापैकी ३४८ हेक्टर क्षेत्रावर कंपनीचे काम सुरू आहे. मात्र लोहखनिज प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने उत्खनन क्षमता १० दशलक्ष टनावरून २६ दशलक्ष टनापर्यंत करण्यासाठी वाढीव ९३७ हेक्टर क्षेत्राची मागणी कंपनीने केली होती. त्यानुसार चार महिन्यांपूर्वी पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली. त्यात बाधित गावांमधील बहुतांश नागरिकांनी पर्यावरणविषयक आक्षेप, शंका घेतल्या नाही. कंपनीच्या वतीनेही इलेक्ट्रिक वाहने, स्लरी पाईपलाईनच्या माध्यमातून लोहखनिजाची वाहतूक होणार असल्याचे स्पष्ट केल्याने पर्यावरण विभागाने या वाढीव लिजला मंजुरी दिली. त्यामुळे आधीचे ३७४ हेक्टर आणि आताचे ९३७ हेक्टर अशा १३११ हेक्टर क्षेत्रातून आता लॅायड्सकडून लोहखनिज काढले जाणार आहे.

विशेष म्हणजे या वाढीव क्षेत्रात पूर्णपणे जंगलच आहे. त्यामुळे या वाढीव लीजमुळे कोणत्याही गावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नसल्याचे कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. गडचिरोली वनवृत्ताला यावर्षी १५ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने दिले आहे. दुसरीकडे लॅायड्स मेटल्सने ग्रीन गडचिरोली हा प्रकल्प हाती घेऊन जिल्ह्यात ३० लाख रोपे लागवड करण्याचा संकल्प केला. त्यासाठी वनविभागाकडे कुठे-कुठे झाडे लावण्यासाठी जागा आहे याची माहितीसुद्धा लॅायड्सने वनविभागाकडे मागविली आहे. त्यामुळे वनविभागाचे १५ लाख झाडे लाऊन ती जगवण्याचे उद्दिष्ट लॅायड्स मेटल्सकडून सहजपणे साध्य केले जाणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच हे वर्ष प्लॅस्टिक निर्मूलन वर्ष म्हणूनही साजरे करण्याचा निर्णय लॉयड्सने घेतला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!