स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित खुल्या कारागृहात कैद्यांसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १३ ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शुक्रवारी स्थानिक खुल्या कारागृहात कैद्यांसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यातील ३६ प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला आहे. याच उपक्रमाअंतर्गत शुक्रवार स्थानिक खुल्या कारागृहात कैद्यांसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत या कार्यक्रमासाठी एकूण ३६ कलासमूह निवडण्यात आले होते. या कार्यक्रमात १००० पेक्षा जास्त कलाकारांनी भाग घेतला. गडचिरोलीत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कारागृह अधीक्षक निमगडे तर प्रमुख प्रबोधनपर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह विलास निंबोरकर, तुरुंग अधिकारी कोकाटे, पत्रकार मिलिंद उमरे, पतंजली योग समितीचे मोडक आदी उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाहीर प्रा. प्रवीण जाधव, ढोलकी वादक जगन्नाथ पाखरे, कोरस विकास जाधव, संजय मेकर्तीवार, शरीफ मानकर, आशीष गुरनुले, अविनाश कतले, चंद्रमणी रायपूरे, मनेश तोडासे, गायत्री चौधरी, पायल मांदाडे, खुशाल ठाकरे, चंचल रोहनकर आदींनी सहकार्य केले.