आपला जिल्हा
जिल्ह्यात १३ कोरोनामुक्त तर १६ कोरोनाबाधित
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १३ ऑगस्ट
आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधीतांची संख्या ८४ झाली आहे. मंगळवारी ४९८ तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १६ कोरोनाबाधित आढळून आले. तर १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ७७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२२ टक्के तर मृत्यू दर २.०५ टक्के झाला आहे.
कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ५, अहेरी ३, भामरागड १, चामोर्शी १, मुलचेरा २ व वडसा तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. नविन बाधितामध्ये गडचिरोली ३, चामोर्शी ९, आरमोरी १ व कुरखेडा ३ जणाचा समावेश आहे.