गडचिरोली शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२४ जुलै
गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) च्या वतीने, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महात्मा गांधी न. प. शाळा (जुनी वस्ती) महात्मा गांधी तसेच गुरुदेव विद्यालय गड़चिरोली येथील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वितरण करण्यात आले. तसेच मातोश्री वृद्धाश्रम गड़चिरोली येतील वृद्धांना जिवनाश्यक वस्तुचे किट्स देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष फरिमभाई काझी, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव कपिल बागडे, गड. ता. अध्यक्ष विवेक बाबनवाडे, माजी सभापती न.प. गड. चे विजय कावळे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेन्दाम, एन. टी. व्हीजे अध्यक्ष किशोर बावणे, सामाजीक न्याय विभागाचे महेश टिपले, ओबीसी विभागाचे संजय सिंगाडे, अंकुश मामीडवार, कुणाल चिलगेलवार, सौरभ खोब्रागडे, ज्ञानदिप गेडाम , राजू तोंडरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.