लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट च्या उलगुलान प्रशिक्षणात सहभागी व्हा
एलएफयु चे आवाहन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २२ जून
लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट पुणे यांचे माध्यमातून गडचिरोली आणि मेळघाट येथील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील होतकरू विद्यार्थ्यांकरीता नीट परिक्षेच्या पुर्व तयारी साठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन वर्ग वर्षभर चालविले जातात. या विशेष प्रशिक्षण वर्गांना उलगुलान असे नाव दिले आहे. या उलगुलान मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील होतकरू आणि इच्छूक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट च्या वतीने करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण निवासी आणि संपूर्णतः मोफत असल्याचे एलएफयु ने म्हटले आहे. अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. मागिल पाच वर्षात उलगुलान मधून १०० हुन अधिक विद्यार्थी यशस्वी झाले. ऊल्लेखनीय आहे की २०२३ च्या नीट परिक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील १० विद्यार्थ्यांनी मेडिकल साठीची पात्रता यशस्वी केली आहे. त्यामुळे एलएफयु चा उत्साह वाढला आहे. यावर्षी अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर उच्च शैक्षणिक पदवी प्राप्त करण्याची अतिदुर्गम, आदिवासी बहुल भागातील संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे एलएफयुने म्हटले आहे. १० वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश देण्यात येणार आहे. १ ऑगस्ट पासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. प्रवेशासाठी ७७२००३३००७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा अशी विनंती केली आहे.