आपला जिल्हाताज्या घडामोडी

केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीच्या प्रसिद्धीसाठी केंद्रीय मंत्री गडचिरोलीत

केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव यांनी शासकीय कार्यक्रमांतर्गत गोंडवाना विद्यापीठाला दिली भेट

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२३ जून 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीतील सरकारचे यशोगान करण्यासाठी भाजपचे देशभर महजन संपर्क अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय कामगार व स्वयंरोजगार, पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे शुक्रवारी गडचिरोलीत आले होते. दरम्यान त्यांनी भाजपच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून केंद्र सरकारच्या यशाची माहिती देणारा प्रचाराचा मार्ग प्रशस्त केला.

ऊल्लेखनीय आहे की केंद्रीय मंत्री गोंडवाना विद्यापीठात चालणाऱ्या विविध प्रकल्पांची विस्तृत माहिती घेण्याच्या दृष्टीने शासकीय दौऱ्यावर आले होते.त्यांनी गोंडवाना विद्यापीठाला धावती भेट देऊन काही काळ येथे चालणाऱ्या प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळीमिशन लाईफ मध्ये सामील होऊन आपण जागतिक हवामान कृतीत योगदान देऊ शकतो तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे,खा.अशोक नेते, यांचेसह विभागिय वनाधिकारी मिलीशदत्त शर्मा, वनवासी कल्याण आश्रमाच्या वनवासी हितरक्षा विभागाचे प्रमुख गिरीश कुबेर उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!