आपला जिल्हाताज्या घडामोडी

विविध दुकानात काम करीत असलेल्या २१ बालकांना घेतले ताब्यात, बाल कल्याण समिती कडे सोपविले

जागतिक बाल कामगार दिवसानिमित्त महिला व बाल विकास विभाग, कैल्यास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन, चाईल्ड लाईन आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.१२ जून 

जागतिक बाल कामगार दिवसानिमित्त महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली, कैल्यास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन, चाईल्ड लाईन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली शहरातील विविध दुकानात काम करीत असलेल्या १८ वर्षांखालील २१ बालकांना धाड मोहीम राबवून ताब्यात घेतले आणि बाल कल्याण समिती समक्ष सादर करण्यात आले.

परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पवार यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर धाड मोहीमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वर्षा मनवर, सदस्य दिनेश बोरकुटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनूले, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष दिलीप बारसागडे, कैल्यास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन प्रकल्प व्यवस्थापक इतिहास मेश्राम, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर, प्रियंका आसुटकर, सामजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, तनोज ढवगाये चाईल्ड लाईन प्रकल्प समनवयक अविनाश राऊत, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार या टीमने सदर कारवाईत सहभाग घेतला.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!