क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

आलापल्लीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार; एटापल्ली पोलिसांनी केला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.११

दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर एका युवकाने अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी(ता.१०) रात्री घडली. याप्रकरणी एटापल्ली पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. त्यानंतर एका ओळखीच्या मुलाने तिला त्याच्या मित्राच्या खोलीवर नेले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला. पहाटे तिला आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावरील अतिप्रसंगाची जोरजोरात वाच्यता केली. दरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याने तिला समजावून तुझी बदनामी होईल. त्यामुळे तक्रार न करता तू घरी जा, असा सल्ला दिला. त्यानंतर ती एटापल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून आरोपींवर गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. त्यानंतर संध्याकाळी एका आरोपीला ताब्यात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला असून, या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक आरोपी आहेत काय, याविषयी तपास सुरु असल्याचे सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!