आपला जिल्हा

गोंडवाना विद्यापीठ संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांची अधिसभेवर नियुक्ती.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२ जानेवारी 

गोंडवाना विद्यापीठ कर्माचारी संघटनेचे सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतिश पडोळे यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे.

सतिश पडोळे हे गोंडवाना विद्यापीठाच्या आस्थापनेवर ऑगस्ट 2012 पासून कार्यरत असून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक केलेली आहे. विद्यापीठातील आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.तसेच सन २०१७ पासून संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी प्रशासकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आग्रही भूमिका घेतली. सतिश पडोळे यांची अधिसभा सदस्य म्हणून नियुक्ती केल्यामुळे त्यांनी  कुलगुरू.  प्र- कुलगुरू तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!