आपला जिल्हाराजकीय

सर्वसामान्यांची तळमळ असलेले प्रमोद पिपरे

वाढदिवसानिमित्त विशेष लेख

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.१२ डिसेंबर 

भाजपा जिल्हा महामंत्री व माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांची लहानपणापासून समाजकार्याची
ओढ व गरीब, वंचितांना न्याय मिळवून देण्याची धडपड प्रमोदभाऊंच्या मनात नेहमीच असायची वंचितांवर होणारे अन्याय त्यांना बघविले जात नसल्याने त्यांनी समाजकारणातून राजकारणात ‘एन्ट्री’ करून वंचितांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. अल्पावधीत सामाजिक दायित्व जोपासणारे व वंचितांचे कैवारी म्हणून प्रमोद पिपरे यांनी आपले नाव मिरविले.महाविद्यालयीन जिवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विविध पद भूषवून १९९० मध्ये भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून सर्वसामान्यांच्या विकासासाठी धावून जात त्यांना न्याय मिळवून दिले, या सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या नेत्याला वाढदिवशी अनंत कोटी शुभेच्छा.

बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजकारणाची ओढ लागली. महाविद्यालयीन जिवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदावर विराजमान होवून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवून त्यांना शिक्षणाचे मार्ग खुले करून दिले. १९९० मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अल्पावधीत या पक्षात हिरहिरीने काम करून लोकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देत पक्ष संघटना मजबुत
करण्यात माजी नगरसेवक प्रमोदभाऊ पिपरे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. शहरात वाढता जनसंपर्क या भरवशावर १९९१ मध्ये भारतीय जनता पार्टीचे पॅनल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लढविले. मात्र, अपयश आले. या अपयशाला खचून न जाता परत जोमाने शहरातील नागरिकांचे काम करून २००१ मध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयाची माळ गळ्यात घातली. त्यानंतर बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, शिक्षण व आरोग्य समिती सभापती या पदावर विराजमान होवून विविध विकास कामे केली. नगर परिषद शाळांमध्ये सोयी सुविधा निर्माण करून गरीब व वंचित घटकातील नागरिकांच्या पाल्यांना चांगल्या शिक्षणाची सोय निर्माण करून दिली.

२००६ च्या निवडणुकीतही विजयी पताका सुरूच ठेवून सलग दहा वर्ष शहर विकासाचा आराखडा
तयार करून विकासकामांना प्राधान्य दिले. त्यानंतर २०११ ते २०१६ पर्यंत पदावर नसतानाही जनतेची कामे करून देत त्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला. याच कामाची पावती म्हणून डिसेंबर २०१६ च्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली शहरातील नागरिकांनी भरभरून साथ दिल्याने भाजपाच्या एका नगराध्यक्षासह २१ नगरसेवकांच्या गळ्यात विजयाची माळ टाकून सेवा करण्याची संधी दिल्यामूळे शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी, रस्ते, नाल्या, खुल्या जागेचे सौंदर्यीकरण, भूमिगत गटार लाईन, वाढीव वस्तीचे विद्युतीकरण, संपूर्ण शहरात एलईडी लाईट तसेच इतर विविध विकासकामे माजी नगराध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वात शासनाकडून करोडो रुपयांची निधी प्राप्त करून पूर्ण करण्यात आली. भाजपाच्या सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा महामंत्री व अखिल
भारतीय तेली महासभा जिल्हाध्यक्ष व ओबीसी कृती समिती जिल्हाध्यक्ष आदी विविध पदाच्या माध्यमातून
ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व तेली समाजाच्या विकासात प्रमोदभाऊंचा सहभाग राहिला आहे.सर्वसामान्यांची तळमळ असलेल्या भाजपा नेते व माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांना वाढदिवसानिमित्त
भरभरून शुभेच्छा!

रमेशभुरसे, प्रदेश सदस्य,भाजपा किसान आघाडी महाराष्ट्र प्रदेश

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!