आपला जिल्हा

जैन कलार समाज केंद्रीय मंडळाच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्हा समिती अविरोध

केंद्रीय मंडळाच्या संचालक पदासाठी गडचिरोलीतून बंडूभाऊ ऊर्फ विनोद शनिवारे आपुलकी पॅनलचे उमेदवार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ डिसें.

नागपूर येथील जैन कलार समाज सार्वजनिक न्यासाच्या केंद्रीय आणि जिल्हा मंडळासाठी निवडणूक घोषित झाली असून या निवडणुकीत आवेदनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली जिल्हा मंडळाची अविरोध निवड झाली आहे. जिल्हा मंडळासाठी आवश्यक पदाधिकाऱ्यांसह २५ सदस्यांसाठी केवळ २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्यामुळे सर्वांची अविरोध निवड झाली आहे. निवडणूक अविरोध करुन समाजाचा लाखो रुपयांचा अकारण खर्च वाचवून गडचिरोली जिल्ह्यातील समाज बांधवांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

निवड झालेल्यांमध्ये रतन शेंडे हे अध्यक्ष पदी, वडसा येथील संदीप दहीकर उपाध्यक्ष पदी तर पांडुरंग पेशने, गडचिरोली यांची सचिव पदी निवड झाली आहे. वडसा येथील अशोक हरडे हे कोषाध्यक्ष पदी तर सहसचिव पदावर चामोर्शीचे वैभव भिवापूरे अविरोध निवडून आले आहेत. अन्य सदस्यांमध्ये महिला प्रतिनिधी म्हणून वर्षा विनोद शनिवारे आणि सुरेखा रणदिवे यांचा समावेश आहे. तर संचालक मंडळात हेमंत डोर्लीकर, डॉ. ऊमेश समर्थ, मनोज बनपूरकर, महेश मुरकुटे, अर्चना मानापूरे,वैशाली लाड, विलास गोटेफोडे, रविंद्र गोटेफोडे, प्रकाश समर्थ, वसंत भांडारकर, केवळराम किरणापूरे, पराग दडवे, गौरव नागपूरकर, अश्विन भांडारकर, वसंत फटींग, गुलाब मानापूरे, रुपेश लाड आणि राजेंद्र घुगरे यांचा समावेश आहे. जैन कलार समाज न्यास नागपूर या समाजसंस्थेच्या मध्यवर्ती मंडळाची निवडणूक आगामी २५ डिसेंबर  रोजी होऊ घातली असून केंद्रीय मंडळाच्या संचालक पदासाठी गडचिरोलीतून बंडूभाऊ ऊर्फ विनोद शनिवारे आपुलकी पॅनलचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. शुक्रवार पासून त्यांचा प्रचार सुरू होणार आहे.

जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यासाठी भूषण समर्थ, विनोद शनिवारे, प्रदीप रणदिवे, मनोज कवठे, सुधीर शेंडे, किशोर भांडारकर, गणेश हरडे, स्वाती कवठे, लता मुरकुटे, भाग्यश्री शेंडे, प्रदीप लाड, अल्केश शनिवारे, धनराज गुरु, वासुदेव लाड, दिलीप दडवे, अर्चना भांडारकर, सरिता पेशने, स्नेहा शेंडे, शारदा हजारे, मनीषा हरडे व जैन कलार  समाज बांधवांनी सहकार्य केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!