आपला जिल्हा
गडचिरोलीत तान्हापोळा उत्साहात साजरा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ ऑगस्ट
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष कोणतेही उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यात आले नाही.मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून दोन वर्षानंतर जिल्हाभर बैलपोळा व तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध बक्षिसे देण्यात आली.
गडचिरोली शहरात रेड्डीगोडाऊन, लांझेडा यासह सर्वत्र तान्हा पोळा साजरा करण्यात आला. लांझेडा येथे प्रथम तीन विजेत्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हातील खेड्यापाड्यातही तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील बाराही तालुक्यात तान्हापोळ्या चे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला.